बारामती | बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'?

 


बारामती: प्रतिनिधी  

              बारामती तालुक्यात आज पहाटेपासून सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापेमारी केली आहे. बारामती तालुक्यातील जळोची खताळ पट्टा आणि झारगडवाडी या गावांमध्ये ईडीकडून छापेमारीची कारवाई सुरू आहे. बारामती तालुक्यातील सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे याच्यावर जवळपास ३५० कोटींहून अधिक वेगवेगळ्या ठिकाणी अपहार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपीचे राजकीयदृष्ट्या पॉवरफुल कनेक्शन असल्याचेही समोर आले आहे.



                     आर्थिक घोटाळ्यातील फरार आरोपी आनंद लोखंडे विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्या पुतण्याने देखील पुण्यात तक्रार दाखल केलेली आहे. वाघोली पोलिस ठाण्यात 7 ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचा पुतण्या विजय सुभाष सावंत यांच्या तक्रारीवरून बारामती तालुक्यातील जळोची येथील आनंद सतीश लोखंडे,सतीश बापुराव लोखंडे,विद्या आनंद लोखंडे आणि सविता सतीश लोखंडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



             विद्यानंद धायरी आणि आनंद लोखंडे या दोघांशी संबंधित चौकशीचा भाग म्हणून करण्यात आली. हा संपूर्ण घोटाळा एका दाम्पत्याद्वारे रचला गेल्याचे समोर आले. त्यांनी पुणे आणि मुंबईतील अनेक व्यावसायिकांना दुग्ध उद्योगात प्रचंड नफा देण्याचे आश्वासन दिले. गुंतवणुकीवर ‘आकर्षक परतावा’ मिळेल या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेडने या प्रकरणी आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे (दोघेही जलोची, तालुका बारामती) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली 

 आरोपीचे राजकीय कनेक्शन..??

         आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी आनंद लोखंडे हा रोहित पवारांचा अत्यंत निकटचा कार्यकर्ता असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोखंडे याने वेगवेगळ्या फर्म काढून मोठी फसवणूक केल्याचं प्रथम दर्शनी समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावरती पतसंस्थांचे कर्ज काढून त्यातही मोठा घोटाळा केल्याच्या तक्रारी दाखल होत्या. रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघात त्याने कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. यामध्ये शाळा बांधून देणे, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, आदी विविध उपक्रम त्याने राबवले असल्याचे समोर आले आहे




               गुंतवणुकीशी संबंधित प्रकरणात आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज मोठी कारवाई केली. ईडीने आज बारामतीमधील ३ ठिकाणी आणि पुण्यातील दोन ठिकाणी एकाच वेळी छापा मारल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने थेट बारामतीमध्ये कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील दोन आणि बारामतीतील तीन ठिकाणी एकाचवेळी छापे टाकत महत्त्वाचे दस्तऐवज आणि डिजिटल पुरावे जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments